सावधान ! ‘या’ बाजारात खुलेआम विकले जातात डुप्लीकेट ‘iPhone’

पोलीसनामा ऑनलाईन : आपण या सणाच्या हंगामात स्मार्टफोन / आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगा आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करा. विशेषत: जेव्हा एखाद्या चांगल्या मोबाइल फोनबद्दल खूपच स्वस्त आणि मोहक ऑफर प्राप्त होत असेल तेव्हा आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आपण सुंदर देखावा, उत्तम अॅप, चांगली वैशिष्ट्ये इत्यादी स्वस्तात मिळवण्याच्या नादात स्वतःचीच फसवणूक करून घेऊ शकता.

दिल्लीत मोठ्या प्रमाणात विक्री होत असलेल्या बनावट मोबाइल फोनची बाजारपेठ एका वृत्तसंस्थेने उघडकीस आणली आहे. चीनचे शेनजेनचे उत्पादन केंद्र त्याच्या डुप्लिकेट उत्पादनांसाठी जगभरात कुख्यात आहे. मात्र वास्तवात पाहू गेल्यास भारताची ‘जुगाड’ प्रणाली देखील चीनच्या डुप्लीकेट वस्तूंना कठोर स्पर्धा देत आहे.

दिल्लीतील नेहरू प्लेस ही दक्षिण आशियातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संगणक भाग, सॉफ्टवेअर, मोबाईल पार्ट्स आणि लॅपटॉप अशा सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ही घाऊक बाजारपेठ आहे. आता असे लक्षात आले आहे की येथील टेक्निशियन मोठ्या वेगाने तस्करीद्वारे मिळवलेल्या भागांच्या मदतीने आयफोन्स तयार करत आहेत.

या किमतीला विकले जातात बनावट आयफोन :
नेहरू प्लेसमधील एका दुकानाचे मालक आणि टेक्निशियनने सांगितल्यानुसार ते ६ एस मॉडेलचा आयफोन फक्त ११,००० रुपयांत किंवा मूळ किंमतीच्या ३० टक्के किमतीत उपलब्ध करुन देतील. याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वस्तू बनत असून त्या तस्करीच्या सुट्ट्या पार्ट्सपासून स्थानिक टेक्निशियनच तयार करतात अशी माहितीही त्याने दिली.

५-१० मिनिटांत तयार होतो मोबाईल :
मिळालेल्या माहितीनुसार, असा बनावट मोबाइल फोन तयार करण्यास फक्त ५-१० मिनिटे लागतात. ते म्हणाले की एक तंत्रज्ञ दिवसात ३०-४० अशी आयफोन बनवू शकतो. येथे एकाच बिल्डिंगमध्ये अनेक दुकाने आहेत. जे प्रत्यक्षात बनावट आयफोनची एक छोटी फॅक्टरी आहे. येथे लोक कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय किंवा उपकरणांशिवाय डझनभर बनावट फोन तयार करतात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like