भारताची मोठी ‘मोहिम’ ! १५ जुलैला अवकाशात झेपावणार ‘चांद्रयान-२’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान -२ मोहिमेद्वारे चांद्रयान पाठवण्यात येणार आहे. इस्त्रोकडून या मोहिमेची जोमाने तयारी करण्यात येत आहे. चांद्रयान मोहिम अंतिम टप्प्यात आली असून १५ जुलैला हे यान अवकाशात झेप घेणार आहे. या मोहिमेसाठी जीएसएलव्ही मार्क – ३ या प्रक्षेपकाचा वापर करण्यात येणार आहे. ही क्षमता असणारा भारत जगातील ५ व्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

अवकाश मोहिमेत विविध विक्रम इस्त्रोने आपल्या नावावर नोंदवले आहेत. मागील दशकात अनेक मोहिमा आखत देशाला मोठे स्थान निर्माण करुन दिले आहे. या मोहिमेसाठी सर्वात महत्वाची प्रणाली इंदापूरच्या वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. चांद्रयान मोहिमे बरोबरच मंगळयान मोहिम तसेच एकाच वेळी १०० पेक्षा आधिक उपग्रह सोडण्याची पहिल्या स्टेज मधील महत्त्वाची बुस्टर केसिंग वालचंदनगरच्या कंपनीच्या अभियंत्यांनी बनवली आहे.

चांद्रयान मोहिम – २
११ वर्षांआधी इस्त्रोने चांद्रयान मोहिम २००८ साली यशस्वी करण्यात आली होती. आता ११ वर्षानंतर पुन्हा चांद्रयान २ मोहिम राबवण्यात येणार आहे. जीेएसएलव्ही मार्क – ३ या प्रेक्षपकाच्या सहाय्याने यान चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. चांद्रयान-२ चे वजन ३.८ टन असणार आहे. ६ सप्टेंबर नंतर चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय