शरीरातील अतिरीक्त ‘चरबी’ आणि ‘वजन’ कमी करण्यासाठी ‘रामबाण’ उपाय आहे अक्रोड !

पोलिसनामा ऑनलाईन – आपल्या शरीराला ड्रायफ्रूट्सचा किती फायदा होतो तर सर्वांनाच माहित आहे. परंतु तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुमच्यासाठी अक्रोडचा खूप फायदा होतो.

अक्रोडमध्ये असतात गुड फॅट्स

अक्रोडमधील गुड फॅट्समुळं वजन वाढत नाही तर कमी होण्यास फायदा होतो. यावर झालेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. अभ्यासकांनी सांगितलं आहे की, अक्रोड भूक कंट्रोल करण्यासाठी मदत करतं त्यामुळं याचा वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो.

अक्रोडमुळं कशा प्रकारे वजन होतं कमी ?

1) मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या इतर नट्सच्या तुलनेत अक्रोडमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स अधिक प्रमाणात असतात. हे फॅट्स गुड फॅट्स असतात. यामुळं कोलेस्ट्ऱॉल कंट्रोलमध्ये राहतं आणि आरोग्य चांगलं राहतं.

2) अक्रोडमध्ये अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड किंवा एएलए (ओमेगा 2 फॅटी अ‍ॅसिडचं एक रूप) असतं जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ओळखलं जातं. यामुळं शरीरातील चरबी कमी कमी करण्यासाठी खूप फायदा होतो.

3) अक्रोडमुळं मेंदूतील राईट इंसुला हा भाग उत्तेजित होतो. मेंदूचा हा भाग भूक नियंत्रित करतो.

4) जर्नल न्युट्रीएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे व्यक्ती अक्रोडमधील 300 कॅलरीज रोज घेतील ते अधिक चांगल्या प्रकारे वजन कमी करू शकतील.

5) एलाजिक अ‍ॅसिड नावाचं एक अँटी ऑक्सिडेंट आहे जे सूज कमी करण्याचं काम करतं आणि आतडे नरोगी ठेवतं. यामुळं पचनक्रिया सुधारते आणि अतिरीक्त कॅलरीज आणि फॅट वेगानं नष्ट होण्यास मदत होते.