Walnut Shell Uses | खुपच कामाची आहेत अक्रोडची सालं, बेकार समजून फेकून देण्यापेक्षा ‘या’ कामाकरिता करा उपयोग, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Walnut Shell Uses | कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. आजकाल प्रत्येक गोष्ट पुन्हा वापरता येते किंवा त्यातून काहीतरी नवीन निर्माण होऊ शकते, जे लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. अक्रोड (Walnut) हे सुक्या मेव्यांपैकी सर्वात पौष्टिक असतात. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स (Vitamins, Minerals) असतात ते शरीरासाठी फायदेशीर असतात. परंतु अक्रोडची सालं (Walnut Shell Uses) आपण फेकून देतो. पण अक्रोड जेवढा उपयुक्त तेवढी त्याची सालही उपयुक्त आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या कामांमध्ये तुम्ही अक्रोडाची सालं वापरू शकता.

 

फेस पॅक (Face Pack) :
अक्रोड शरीरासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे त्याची साल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण अक्रोडची साल वापरू शकता (Walnut Shell For Face). अक्रोडाच्या सालींचा फेस पॅक बनवून तो चेहर्‍यावर लावा, यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जाऊन त्वचा चमकते. अक्रोडाच्या सालींचा पॅक चेहर्‍यावर लावल्याने डागही दूर होतात आणि ब्लॅकहेड्सही स्वच्छ होतात. तेलकट त्वचेसाठी अक्रोडच्या सालीचा फेस पॅक सर्वात फायदेशीर असतो.

 

कंपोस्ट (Compost) :
अक्रोडच्या सालीपासून बनविलेले कंपोस्ट शरीरासाठी तसेच वृक्ष वनस्पतींसाठी चांगले असते. अक्रोडच्या सालीने तुम्ही रोपांसाठी खत बनवू शकता. ते उत्तम सेंद्रिय खत म्हणून काम करतात. अक्रोडाच्या सालीपासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अक्रोडाच्या सालीवर (Walnut Shell Uses) एक चमचा अल्कोहोल टाकून जाळून त्याची राख करा. जळालेल्या सालीची राख कुस्करून ती रोपवाटिकेत टाकावी.

घराची सजावट (Home Decor):
लोक घर सजवण्यासाठी अनेकदा हस्तकलेचा वापर करतात. पाश्चात्त्य वस्तूंचा पुनर्वापर करून चांगल्या हस्तकला बनवता येतात. अक्रोडच्या सालींनी तुम्ही घरही सजवू शकता. त्यासाठी अक्रोडच्या सालीपासून तुम्ही वॉल आर्ट तयार करता. पुठ्ठ्याला किंवा कोणत्याही कठीण वस्तूला रंग लावून त्यावर अक्रोडाची सालं गोंदच्या साहाय्याने चिकटवून वेगवेगळ्या रंगांनी सजवून भिंतीवर टांगून ठेवा.

 

माउथवॉश बनवा (Make Mouthwash) :
अक्रोडच्या सालीने नैसर्गिक माउथवॉश देखील तयार करू शकता. एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी आणि अक्रोडाची सालं घालून तीस मिनिटं उकळवा.
उकळलेले पाणी थंड करून बाटलीत भरून घ्या. दात घासल्यानंतर अक्रोडच्या सालीने तयार केलेल्या माऊथ वॉशने तोंड स्वच्छ धुवावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Walnut Shell Uses | walnut shell uses in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

 

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

 

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या