‘अक्रोड’ खाण्याची सवय पाडावी, म्हातारपणातही रहाल ‘निरोगी’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते हे प्रत्येकाने ऐकले असेलच. याव्यतिरिक्त अक्रोड खाल्ल्याने स्त्रिया निरोगी राहतात आणि सुरकुत्या होण्याची समस्या देखील कमी होते. दरम्यान नुकत्याच झालेल्या संशोधनात असा दावा केला गेला आहे की आठवड्यातून दोन अक्रोड खाणार्‍या स्त्रिया म्हातारपणातही निरोगी राहतात.

वाढत्या वयात चांगले मानसिक आणि शारीरिक आरोग्य राहिल्यास स्त्रियांच्या वयातही वाढ होते. निरोगी राहण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त होऊ नये हे महत्वाचे असते. फ्रान्समधील बॉरड्यूक्स पॉप्युलेशन हेल्थ रिसर्च सेंटरच्या संशोधकांना असे आढळले आहे की आठवड्यातून दोन अक्रोड खाणाऱ्या 50-60 वयोगटातील स्त्रियांमध्ये वृद्धत्वाच्या दरम्यान निरोगी राहण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत जास्त असते.

जर्नल ऑफ एजिंग रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार वृद्ध वयस्कांच्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक लक्षात घेता असे आढळले आहे की अक्रोड हे एकमेव असे ड्राय फ्रूट आहे जे वृद्धत्वाच्या दरम्यान निरोगी राहण्यास मदत करते. यापूर्वीही अशी अनेक संशोधने केली गेली आहेत ज्यात असे दिसून आले आहे की अक्रोड खाण्यामुळे म्हातारपणात शारीरिक कमजोरी कमी होते.

याव्यतिरिक्त, अक्रोडचे सेवन केल्याने हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील कमी होतो असे संशोधकांना आढळले आहे. तथापि, अक्रोड हे वृद्धत्व थांबवण्याचा मार्ग नाही. परंतु आपल्या खानपानात सकारात्मक बदल जसे की स्नॅक म्हणून मूठभर अक्रोड खाऊन वाढत्या वयातील परिणामांपासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात दूर राहू शकता.