मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आता वंजारी समाजाने आरक्षणावरून बीडमध्ये मोर्चा काढला. विशेष म्हणजे वंजारा समजाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या मुंडे बहीण-भावाला डावलून हा मोर्चा काढण्यात आल्याने त्यांना का डावलण्यात आले यावरून बीड मध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. मुंडेंच्या बालेकिल्ल्यातच वंजारा समाजाने मुंडे बहीण भावाला डावलून वंजारा समाजाने आज मोर्चा काढला.

मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आत्ता वंजारी समाजाच्या आरक्षण प्रश्नानाने डोकेवर काढले आहे. बँक टू ओबीसीचा नारा देत या समाजाने ‘निर्धार आरक्षणा’चा म्हणत महाराष्ट्रातील पहिला मोर्चा बीडमध्ये काढला. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने वंजारी महिलां, मुली, तरुण वयोवृद्ध, सर्वच सहभागी झाले होते. पंकजा किंवा धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वाशिवाय मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये पंकजा किंवा धनंजय मुंडेंना डावलून कोणत्याही संघटनेची मदत न घेता हा मोर्चा काढण्यात आला.

बीडमध्ये मुंडे घराण्याचे वर्चस्व असून दोन्ही मुंडे वंजारा समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र, आज त्यां दोघांना डावलून मोर्चा काढल्याने बहीण भावांना आगामी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच वंजारा समाज कोणाच्याही नेतृत्वाशिवाय मोर्चा काढल्याने या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर वंजारा समाजाने काढलेल्या मोर्चामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

आरोग्यविषयक वृत्त