IndianOil HDFC Bank Credit Card : 50 लीटर फ्री पेट्रोल-डिझेल मिळवण्याची संधी, ताबडतोब घ्या लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, शनिवारी पेट्रोलच्या किमतीत विक्रमी 39 पैसे प्रति लीटर आणि डिझेलमध्ये 37 पैसे प्रति लीटरची वाढ झाली. यासोबतच किमतीमध्ये लागोपाठ 12 व्या दिवशी वाढ झाली. अशावेळी जर एक वर्षांत 50 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री दिले गेले, तर यावर तुम्ही काय म्हणाल? होय, इंडियन ऑईल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास हे शक्य आहे.

मिळतात ’फ्यूल पॉईंट्स’

इंडियन ऑईल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे ग्राहक आयओसीएल आऊटलेट्सवर ’फ्यूल पॉईंट्स’ नावाचे रिवॉर्ड पॉईंट मिळवू शकतात. इतकेच नव्हे, ग्रोसरी, बिल पेमेंट आणि शॉपिंगसारख्या अन्य खर्चावर सुद्धा ग्राहक फ्यूल पॉईंट्स अर्न करू शकतात. फ्यूल पॉईंट रिडीम करून ग्राहक वार्षिक 50 लीटरपर्यंत फ्यूल मिळवू शकतात.

या कार्डद्वारे फ्यूल खरेदी करताना जेवढे पैसे खर्च करता त्याच्या 5 टक्के तुम्हाला फ्यूल पॉईंट्सच्या रूपात मिळतात. इंडियन ऑईलच्या आऊटलेटवर पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला मॅक्सिमम 50 फ्यूल पॉईंट मिळतात. 6 महिन्यानंतर तुम्ही मॅक्सिमम 150 फ्यूल पॉईंट्स मिळवू शकता. फ्यूलशिवाय अन्य शॉपिंगवर सुद्धा तुम्हाला 150 रुपये खर्च केल्यावर 1 फ्यूल पॉईंट मिळतो.

कार्डची वार्षिक फी 500 रुपये

कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. मात्र, एक वर्षात किमान 50 हजार रुपये स्पेंड केल्यास कोणतीही वार्षिक फी द्यावी लागणार नाही. हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाइी तुम्ही एचडीएफसी बँकेची वेबसाइट hdfcbank.com  वर जाऊन अप्लाय करू शकता किंवा जवळच्या ब्रँचमध्ये जाऊन सुद्धा अ‍ॅप्लाय करू शकता.