‘आधार’कार्ड वरील नाव, पत्ता आणि जन्म तारीख बदलण्यासाठी UIDAI नं जारी केला नवा नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचे महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे. म्हणूनच, आपल्या आधारची माहिती बरोबर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट किंवा बदलू इच्छित असल्यास आणि आपण ती करण्यास सक्षम नसाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आधार जारी करणारी कंपनी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार अपडेटसाठीच्या नियमात काही बदल केले आहेत. आधार कार्डाशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी यूआयडीएआयने काही शहरांमध्ये आधार सेवा केंद्र सुरू केले आहे, जिथे नवीन आधार देखील बनवू शकता. तसेच पत्ता, नाव आणि जन्मतारीखमध्ये बदल किंवा अपडेट करून या सेवेचा लाभही घेता येईल.

आधार सेवा केंद्राच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.
– नवीन आधार तयार करण्यासाठी
– नाव किंवा पत्ता अपडेट करण्यासाठी
– जन्मतारीख अपडेट करण्यासाठी
– मोबाइल नंबर तसेच ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी
– लिंग अपडेट करण्यासाठी
– बायोमेट्रिक अपडेटसाठी या सर्वांसाठी अपॉईंटमेंट घणे गरजेचे आहे.

अशी घ्या अपॉईंटमेंट- 
– यासाठी प्रथम आपल्याला यूआयडीएआय वेबसाइट (https://uidai.gov.in/) वर जावे लागेल.
– आता त्यातील ‘माझा आधार’ वर क्लिक करा. यानंतर ‘बुक अ अपॉईंटमेंट’ या ऑप्शनवर जा.
– आता तुम्हाला येथे शहराच्या स्थानाचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला शहर निवडावे लागेल. शहर निवडल्यानंतर आपल्याला “प्रोसीड टू बुक एन अपॉइंटमेंट” वर क्लिक करावे लागेल.
– आता एक नवीन पेज उघडेल. त्यात नवीन आधार, आधार अपडेट आणि मॅनेजमेंट अपॉईंटमेंट्स असे तीन पर्याय आहेत. आपण आपल्या आवश्यकतेनुसार यापैकी कोणतीही एक निवडू शकता. समजा आपण आधार अद्यतन पर्याय निवडल्यास आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी प्रविष्ट केल्यास आपला अर्ज सत्यापित होईल.
– ओटीपी पडताळणी झाल्यावर तुम्ही तुमची माहिती तेथे दिलेल्या फॉर्ममध्ये भरा. या फॉर्ममध्ये अपॉईंटमेंट संबंधित तपशील विचारला जातो. हा तपशील भरल्यानंतर, आपल्याला बुकिंग अपॉइंटमेंटसाठी टाइम स्लॉट निवडावा लागेल.
– त्यांनतर तुमची अपॉईंटमेंट तपासा, तुम्हाला बदल करायचा असेल तर मागील टॅबवर क्लिक करा अन्यथा सबमिट बटणावर क्लिक करा. ही ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/