गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.

अनिकेत उर्फ चिक्या हरिश कांबळे (वय २१, बौध्द वस्ती, लोणीकाळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पथक शङरातील सराईत गुंड, सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे असलेले आरोपी यांची तपासणी करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणी काळभोर येथील गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेला अनिकेत उर्फ चिक्या हरिश कांबळे हा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा तो चारचाकी वाहनांच्या पार्किंगमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी गायकवाड, इरफान मोमीन, माळवदकर यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like