प्रशांत किशोर यांची राजनीती सोडण्याची घोषणा, म्हणाले- मी आता ब्रेक घेतोय, आयुष्यात दुसरे काहीतरी करेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपने 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास निवडणूक रणनीतीकार म्हणून मी करत असलेले काम थांबवेन अशी घोषणा केलेल्या प्रशांत किशोर यांनी सर्वानांच धक्का दिला आहे. बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत. अशावेळी किशोर यांचा अंदाज खरा ठरत असून त्यांनी त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेले काम थांबवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी आता ब्रेक घेत आहे. आयुष्यात काहीतरी वेगळ करायचे असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या 8 ते 9 वर्षापासून मी निवडणूक रणनीतीकार म्हणून या क्षेत्रात काम करत आहे. मला आता आयुष्यात वेगळ काहीतरी करायचे असून ते मी करणार आहे. मी हे काम आयुष्यभर करणार नाही असे मी यापूर्वी अनेकदा म्हटले आहे. आयपॅकमध्ये माझे अनेक चांगले सहकारी आहेत. ते उत्तम काम करत आहेत. त्यांनी त्यांचे काम असच सुरु ठेवावे, असे किशोर यांनी म्हटले आहे. तुम्ही राजकारणात जाणार का, असा सवाल किशोर यांना विचारला असता, त्यावर उत्तर देणे त्यांनी टाळले आहे. राजकारणात जाणार की नाही याबाबत मी आता काही बोलत नाही. पण आता करत असलेल काम थांबवत असल्याचे ते म्हणाले.