बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्यास वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन वर्षांपूर्वीच्या भाडणाचा बदला घेण्यासाठी बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या कडून १ पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

फ्रॅकी उर्फ छोटु रॉवट रवामी (वय २२, रा. संतगाडगे महाराज शाळेशेजारी, कोंढवा खुर्द) असे अटक केल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पाहिजे असणारे व सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. तर वाढत्या वाहन चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक हद्दीत घालत होते.

त्यावेळी सहायक फोउजडार प्रदीप गुरुव याना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, स्टेफीन हॉटेल जवळ केदारीनगर येथे एकजण उभा असून त्याच्याजवळ पिस्टूल आहे. त्यानुसार परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे याच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी सापळा रचून स्वामी याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता एक देशी बनावटीचा गावठी लोखंडी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे मलूल आली.

विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगतिले कि, पिस्तूल महेश उर्फ मयुर घाणे यांच्याकडून घेतले आहे. दोन वर्षा पुवी अक्षय व शुभम कदम त्यांच्या साथीदारांनी पूर्ववैमन्यासातून गणेश विसर्जन मिरवणुकीत सशस्त्र हल्ला केला होता. त्याचा बदल घेण्यासाठी आरोपीने पिस्तूल बाळगल्याने सांगितले.

Visit : Policenama.com