मोबाईल व वाहने चोरणारी गँग वानवडी पोलिसांच्या जाळ्यात, 45 मोबाईल आणि 13 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील विविध भागात पार्किंग केलेल्या दुचाकी आणि नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या गँगला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 17 गुन्ह्यांची उकल करत साडे सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अजितनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24, कृष्णा नगर मोहम्मद वाडी), तुकाराम मनोहर चोपडे (वय 19 रा. कृष्णा नगर मोहम्मदवाडी) रोहित रामप्रताप वर्मा (वय 19, रा. कृष्णानगर मोहम्मदवाडी) आणि पवित्र सिंग गब्बर सिंग टाक (वय 19. रामटेकडी हडपसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

शहरात दुचाकी आणि एकट्या फिरणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातही दुचाकी चोरट्यानी तर धुमाकूळ घातला आहे. दरदिवसाला 4 ते 5 वाहने चोरून नेली जात आहेत. दरम्यान या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांनी हद्दीत गस्त वाढवून चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी पथक चोरट्यांचा माहिती काढत होते.

यादरम्यान पोलीस नाईक संभाजी देविकर व पोलीस शिपाई नासेर देशमुख यांना या गँगची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनील कलगुटकर  यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पो. नि. गुन्हे सलीम चाऊस पथकातील उपनिरीक्षक अंकुश डोंबळे, सहायक फौजदार रमेश भोसले, पो हवा राजु रासगे,  पो ना योगेश गायकवाड , संभाजी देवीकर, पो शि नवनाथ खताळ, महेश कांबळे, नासेर देशमुख, सुधीर सोनावणे, अनुप सांगले, प्रतीक लाहीगुडे यांच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. अटककरून सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या कडून आतापर्यंत 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 13 दुचाकी व 45 मोबाईल असा 7 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

वानवडी, हडपसर, कोंढवा, भारती विद्यपीठ आणि ग्रामीण परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like