Wanwadi Pune Crime News | धुलीवंदनाच्या अनुषंगाने हातभट्टीच्या तयार दारुचा मोठा साठा जप्त ! वानवडी पोलिसांनी 300 लिटर तयार दारू हस्तगत

Wanwadi Pune Crime News | A large stock of ready-made liquor seized in connection with Dhuli Vandana! Wanwadi police seize 300 liters of ready-made liquor

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Wanwadi Pune Crime News | होळी व धुलीवंदनाच्या अनुषंगाने हातभट्टीच्या तयार दारुचा मोठा साठा वानवडी पोलिसांनी हिंगणे मळा येथून जप्त केला. त्यात ३५ लिटरचे ८ मोठे कॅन, ३ पोत्यात २० लिटर दारु असे एकूण ३०० लिटरची तयार दारु जप्त केली आहे.

शहरात धुलीवंदनाच्या सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखून बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी वानवडी परिसरात पोलीस दुचाकीवरुन गस्त घालत होते. हिंगणेमळा येथील समर्थनगरमध्ये ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता आले असता सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, समर्थनगर येथे एक जण आपल्याजवळ तयार हातभट्टीच्या दारुची विक्री करत आहे.

ही बातमी मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. दारु विक्री करणारा चाँद अमीन सय्यद (वय ४८, रा. गल्ली नं. ६, समर्थनगर,हिंगणेमळा रोड, हडपसर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केल्यावर त्यात गावठी हातभट्टीची दारु मिळून आली. त्या ठिकाणच्या पत्र्याच्या शेडच्या आजू बाजूला शोध घेतल्यावर तेथे ३५ लिटरचे ८ हत्ती कॅन, तेथेच नायलॉनच्या ३ पोत्यात २० लिटर तयार हातभट्टीची दारु अशी एकूण ३०० लिटर तयार दारु मिळून आली. पोलिसांनी ३० हजार ३१० रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे पोलीस अंमलदार दिवटे, पारधी यांनी केली आहे.

Total
0
Shares
Related Posts