Wanwadi Pune Crime News | अग्निशमन दलाकडून भाऊबीजेच्या दिवशी भाऊ -बहिणीला जीवदान; विषारी औषध पिऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Wanwadi Pune Crime News | Firefighters give life to brother-sister on Bhuabiji Day; He attempted suicide by drinking poison

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Wanwadi Pune Crime News | वानवडी येथील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसर्‍या मजल्यावरील सदनिकेत भाऊ व बहिण दरवाजा लॉक होऊन अडकले असल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले. त्यांनी दरवाजा उघडला. आतमध्ये भाऊ बहिण बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मानसिक विवंचनेतून भाऊबहिणींनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता (Attempt To Suicide). दोघांना तातडीने औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Pune Fire Brigade) भाऊबीजेच्या दिवशी भाऊ -बहिणींना जीवदान दिले आहे.

वानवडीतील विकासनगरमधील कृष्ण कन्हैया सोसायटीत हा प्रकार घडला़ घटनास्थळी जवान पोहोचताच तिथे उपस्थित पोलिस कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली असता, सदनिकेत भाऊ (वय १९) व बहिण (वय २४) हे आतमध्ये स्वत: घरगुती कारणानिमित्त मानसिक विंवचनेत असून जीवाचे बरे वाईट करण्याचे सांगत आहेत. त्यांची आई बाहेर होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी क्षणाचा ही विलंब न करता अग्निशमन उपकरण डोअर ब्रेकर, कटावणी, पहार यांच्या साह्याने सुमारे दहा मिनिटातच सदनिकेचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

त्याचवेळी दोघे ही जण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहताच जवानांनी तातडीने अग्निशमन दलाच्या वाहनातूनच जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जवानांनी डॉक्टर यांच्याकडे त्या दोघांविषयी चौकशी केली असता, डॉक्टरांनी या दोघांना अगदी वेळेत उपचाराकरिता दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले असून सद्यस्थितीत दोघे ही लवकरच बरे होतील असे सांगण्यात आले. दिवाळी सणात भाऊबीजेच्या दिवशी उचित वेळेत केलेल्या कामगिरीने भाऊ व बहिणेचे प्राण वाचविता आले, हे जवानांना समाधान देणारे होते.
या घटनेत वाहनचालक दत्ता अडाळगे, सत्यम चौंखडे तसेच जवान सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी सहभाग घेतला.

Total
0
Shares
Related Posts