ADV

Wanwadi Pune Crime News | पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांवर गुन्हा, तडीपार गुन्हेगारासह 3 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Wanwadi Pune Crime News | दरोडा टाकण्याच्या तयारीत (Robbery Attempt) असलेल्या तडीपार गुन्हेगारासह (Tadipar Criminal) तिघांना वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.11) रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातील (Ramtekdi Industrial Estate) बुधानी वेफर्स कंपनीच्या (Budhani Wafers Company) बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य उर्फ गोऱ्या महेंद्र शिंदे (वय-22 रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर), साहील खंडू पेठे (वय-24), नोवेल जॉन वाल्हेकर (वय-19 दोघे रा. महंमदवाडी रोड, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रोहन शिंदे, सुहान मुनावर खान (रा. रामटेकडी), रोहित साबळे (रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यावर आयपीसी 399, 402 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार संदिप आनंदा साळवे (वय-36) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Wanwadi Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामधील बुधानी वेफर्स कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही तरुण हातात धारदार हत्यारे घेऊन दरोडा टाकणार आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींचे तीन साथीदार पळून गेला. तर तीन जणांना पकडले. त्यांच्याकडून लोखंडी सुरा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता एच.पी. पेट्रोलपंपाची रक्कम दरोडा टाकून लुटणार असल्याचे सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आदित्य उर्फ गोऱ्या शिंदे आणि साहील पेठे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आदित्य शिंदे याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, पोक्सो अॅक्ट, आर्म अॅक्ट असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच एप्रिल 2024 मध्ये त्याला सहा महिन्याकरीता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारी च्या आदेशाचे उल्लंघन करुन तो परिसरात फिरत होता. तर आरोपी साहील पेठे याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात तीन आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baner Pune Crime News | पुणे : अनैतिक संबंधातुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून, बाणेर परिसरातील घटना; गुन्हे शाखेने ठाणे जिल्ह्यातून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Cheating With US Woman | ज्वेलर्सने अमेरिकन महिलेला घातला गंडा, 6 कोटींमध्ये विकला 300 रुपयांचा बनावट दागिना

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal | ना मंगलाष्टका, ना फेरे, अन्य धर्मातील जहीर सोबत रजिस्टर मॅरेज करणार सोनाक्षी?, ‘या’ दिवशी असेल रिसेप्शन!

Gautam Adani | डिफेन्स सेक्टरमध्ये वाढणार गौतम अदानींचा दबदबा… UAE च्या कंपनीसोबत मोठी डील, बनवणार ड्रोन आणि मिसाईल