पूर्वीच्या भांडणातून तरुणावर वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाला चाकूने भोकसल्याची घटना बुधवारी (दि. 20) दुपारी एकच्या सुमारास सावता माळी मंदिराजवळ जाधववाडी, चिखली येथे घडली. सखाराम जाधव असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सखाराम यांच्या पत्नी कविता सखाराम जाधव (26, रा. सावता माळी मंदिराजवळ जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम राठोड (38, रा. जाधववाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सखाराम आणि आरोपी विनोद यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले आहे.

बुधवारी दुपारी सखाराम यांनी विनोद याला ‘माझ्या पत्नीला का त्रास देतोस?’ अशी विचारणा केली. त्यावरून विनोद याने ‘तू बिल्डिंगच्या खाली ये, तुला बघतो’ अशी धमकी दिली. सखाराम खाली आले असता विनोद याने त्याच्याकडील चाकूने सखाराम यांच्या पोटात मारले. यामध्ये सखाराम गंभीर जखमी झाले. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com