Mumbai News : औषध लावण्याच्या बहाण्यानं ‘तो’ तरुणीच्या गुप्तांगाला स्पर्श करायचा, अखेर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्जरीसाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वॉर्डबॉयला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मालाड पूर्वमधील एका खासगी रुग्णायतील हा प्रकार आहे. अटक झालेल्या वॉर्डबॉयचं नाव मुकेश प्रजापती आहे. सदर आोरपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. गेल्या एका वर्षापासून तो या रुग्णालयात काम करत आहे.

नेमकं प्रकरण काय ?
सदर 24 वर्षीय तरुणी मूळव्याधीवरील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी वॉर्डबॉय त्या मुलीच्या रूममध्ये गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा विनयभंग केला.

दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजापतीनं तरुणीला ऑपरेशनआधी औषध लावायचं आहे असं खोटं सांगितलं. यावेळी औषध लावण्याच्या बहाण्यानं त्यानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला.

जेव्हा तरुणीचं ऑपेरशन झालं तेव्हा तिनं आणि कुटुंबीयांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.