धक्कादायक ! महापौरांच्या मुलाने डोळा मारल्याने नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे ‘धाव’

पटना : वृत्तसंस्था – बिहारमधील पटना महानगर पालिकेच्या बैठकीत महापौरांच्या मुलाने नगरसेविकाला डोळा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. महापौर सीता साहू यांनी मुलाला समज देण्याऐवजी मात्र पीडित नगसेविकेलाच दोषी धरले आहे. त्यामुळे पीडित नगसेविकेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेत यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत महापौरांचा मुलगा नगरसेवक नसतानाही हजर होता.

पिंकी देवी असे पीडित नगसेविकेचे नाव आहे. माझ्यासोबत जी घटना घडली इतर महिलांसोबत घडू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी देवी यांनी केली आहे. तसेच हा प्रकार थांबला नाही तर आपण महिला आयोग किंवा न्यायालयात जाऊ, असा इशाराही दिला आहे.

पिंकी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महानगर पालिकेच्या बैठकीत महापौरांचा मुलगा शिशिर कुमार नगरसेवक नसतानाही हजर होता. बैठक सुरू असताना शिशिर बघून हसला आणि डोळा मारला. मी त्याला तुझ्या आईकडे तक्रार करेल अशी धमकी दिली. मात्र तरीही त्याची ही कृती वारंवार सुरूच होती. याप्रकरणी महापौरांकडे तक्रारही केली. मात्र महापौरांनी तुझी चुकी असल्याचे नगरसेविकाला सुनावले. त्यानी मला माझीच चुक असल्याचे सुनावले. तुम्ही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता, असे त्या म्हणाल्या. ‘ नगसेविका पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांच्या मुलांविरूद्ध छेडछाडीचा आरोप केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like