Corona Vaccine : धक्कादायक ! ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू ?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. परंतु या लसीचे दूष्पपरिणाम (साईड इफेक्ट)अनेक लोकांमध्ये दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 45 वर्षीय वॉर्ड बॉयचाला कोरोना लस दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. लस घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबातील लोंकानी केला आहे. लस घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिपाल सिंह असं मृत्यू झालेल्या वॉर्ड बॉयचं नाव आहे. त्यांनी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ही लस घेतली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांमध्ये दूष्पपरिणाम (साईड इफेक्ट) दिसून आले आहेत. यामुळे तीन जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच महिपाल सिंह यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केले. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी महिपाल यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. मात्र कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्यामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत 52 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनावरील लस दिल्यानंतर त्रास झाला होता. त्यापैकी काहींनी अ‍ॅलर्जीची तक्रार केली तर काही जणांची भीती व्यक्त केली.

कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या दिवशी 17,072 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. तर देशात आतापर्यंत एकूण 2,24,301 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. याबाबत दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, शनिवारी साईड इफेक्टसीची 51 किरकोळ प्रकरणे नोंदली गेली, त्यातील काहींना किरकोळ समस्या जाणवल्या. मात्र, एका आरोग्य कर्मचाऱ्याची तब्येत थोडी गंभीर होती. त्या कर्मचाऱ्याला एम्समध्ये दाखल केले आहे. या कर्मचाऱ्याचे वय 22 वर्षे असून तो सुरक्षा रक्षकाचे काम करतो. एकंदरीत, फक्त एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उर्वरित 51 जणांना थोड्यावेळ तपासणी केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तसेच मेक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.