Wardha Car Accident | नदीत कार कोसळून वर्ध्यात भीषण अपघात; भाजप आमदाराच्या मुलासह मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यु

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Wardha Car Accident | भरधाव जात असताना एसयुव्ही (SUV) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरुन गाडी ४० फुट खोल नदीत कोसळून त्यात ७ मेडिकलच्या (7 Medical Students Died) विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. हे सर्व विद्यार्थी दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे (Datta Meghe Medical College) विद्यार्थी असून ते वसतीगृहात रहात होते. त्यात तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले (Avishkar Vijay Rahangdale)
याचा समावेश आहे. (Wardha Car Accident)

 

नितेशसिंग, विवेक नंदन, प्रत्युशसिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती, नीरज चौहान अशी या इतर विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील ३ विद्यार्थी उत्तर प्रदेशचे तर २ बिहार आणि एक ओडिशा येथील राहणारे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, हे सर्व विद्यार्थी MBBS चे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. कॉलेजच्या वसतीगृहात रहात होते. दररोज रात्री १० वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा हे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचे लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना त्याची कल्पना देण्यात आले. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर आलो असल्याचे आपल्या पालकांना कळविले होते. रात्री उशिरापर्यंत हे विद्यार्थी हॉस्टेलवर परत न आल्याने हॉस्टेलमधील वरिष्ठांना त्यांची चिंता लागून राहिली होती.

पहाटेच्या सुमारास या अपघाताची माहिती समोर आली. हे विद्यार्थी वाढदिवस साजरा करुन देवळी येथून वर्धा येथे येत असताना सेलसुराजवळ नदीच्या पुलावरुन त्यांची कार पाण्यात कोसळली (Wardha Car Accident). या घटनेची माहिती समजताच वर्धाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप (SDPO Piyush Jagtap) व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार वाजेपर्यंत सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सर्वांचे मृतदेह वर्धा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 

Web Title : Wardha Car Accident | wardha car accident bjp mla vijay rahangdales son avishkar
rahangdale and others 7 MBBS students of datta meghe medical college killed in crash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात