Wardha Crime | प्रेमाच्या प्रकरणात जेरबंद ! बाहेर आल्यावर उदरनिर्वाहासाठी टाकली टपरी, अन् संपवलं जीवन

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Wardha Crime | वर्धा शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर (Girlfriend ) प्रेम करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली (Wardha Crime) आहे. धक्कादायक बाब अशी की मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या नैराश्याने या युवकाने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. सौरभ अनिल मस्के (Saurabh Anil Maske) (वय 21 रा. वायगाव, वर्धा) असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, सौरभ मस्के (Saurabh Maske) याने येथीलच एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी देवळी पोलीस ठाण्यात (Deoli Police Station) सौरभविरोधात तक्रार केली होती. त्यावरून पोलिसानी शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीनं केलं. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सौरभ मस्के याच्यावर कलम 363 भादवी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला. तर, सौरभची न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) रवानगी केली गेली. सुटका झाल्यावर सौरभने आपलं पोट भरण्यासाठी गावातच एक पान टपरी टाकली. आणि त्याठिकाणी भाड्याने राहत होता. मात्र कथित प्रकरणाने समाजातील त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असल्याने त्याच्या मनात चिंता निर्माण झाली होती. (Wardha Crime)

दरम्यान, आपली यामुळे समाजात खूप बदनामी झाली असल्याने सौरभने आपल्या परिवाराकडेही दुर्लक्ष केले होते. मंगळवार (28 डिसेंबर) रोजी रोजच्या प्रमाणे आपली पान टपरी उघडली. मात्र त्या दिवशी त्याच्या मनात चिंता त्रस्त करत होत्या. या कारणाने त्याठिकाणी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान टॉवेलने गळफास (Suicide) घेतला. या घटनेमुळे त्याच्या कुंटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, याप्रकरणी देवळी पोलिसानी (Deoli Police Station) कलम 174 जा.फो. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title : Wardha Crime | girlfriend leaves boyfriend commits suicide after getting out of jail at wardha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात