Wardha Crime | आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा यांचे पती डॉ. नीरज कदमला अटक

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Wardha Crime | राज्यात गाजत असलेल्या आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात (Illegal Abortion) प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा (Dr. Rekha) यांचे पती डॉ. नीरज कदम (Dr. Neeraj Kadam) याला अखेर अटक (Wardha Crime) करण्यात आली आहे. रविवारी (दि.16) पहाटे आर्वी पोलिसांनी (Arvi police) अटक (Arrest) केली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, पोस्को अंतर्गत (POCSO Act) ही अटक करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके (SDPO Sunil Solunke) यांनी सांगितले आहे.

 

विशेष म्हणजे वैद्यकीय गैर कारभार बद्दल आरोग्य विभागाने (Health Department) अद्याप पोलीस तक्रार न केल्याने, पोलीस अवैध गर्भपात करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई (Legal Action) करीत आहेत. (Wardha Crime)

 

पोलिसांनी आरोग्य विभागास रुग्णालयाचा मुदत बाह्य परवाना, सापडलेली हाडे व कवट्या,
नियमबाह्य औषधी खरेदी व अन्य वैद्यकीय त्रुटींबाबत तक्रार करण्याबाबत पत्रच दिले.
मात्र, या विषयी अधिकार असलेल्या आरोग्य खात्याने तक्रारच दिलेली नाही.
तक्रार आल्यावर गुन्हे (FIR) दाखल करीत कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

 

Web Title :- Wardha Crime | the main accused in the illegal abortion case dr rekhas husband dr neeraj kadam arrested by arvi police of wardha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा