Wardha Hingan Ghat Case | हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी विकेश नगराळे दोषी, फाशी की जन्मठेप? पीडितेच्या स्मृतीदिनीच निकाल

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडाने (Wardha Hingan Ghat Case) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. एकतर्फी प्रेमातून (One-Sided Love) एका शिक्षिकेला (Teacher) जिवंत जाळण्यात आले होते. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी (Wardha Hingan Ghat Case) न्यायालयाने आज निकाल दिला आहे. आरोपी विकेश नगराळेनं (Vikesh Nagarale) एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं, हा गुन्हा न्यायालयात सिद्ध (Crime proved in court) झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी (Guilty) ठरवलं आहे. आज न्यायालयात दोष सिद्ध झाला. उद्या दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची महिती सरकारी वकील उज्वल निकम (Public Prosecutor Ujjwal Nikam) यांनी दिली आहे.

 

एकतर्फी प्रेमातून एका शिक्षेकेला जिवंत जाळण्यात आले त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी (Wardha Hingan Ghat Case) आज न्यायालयात सुनावणी पार पडली. आज आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्याला न्यायालयाच्या वतीने दोषी ठरवण्यात (Convicted Court) आलं आहे. न्यायालय दोषीला शिक्षा सुनावणार असून निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला होता.
आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र (Charge Sheet), 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
महत्वाचे म्हणजे पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल दिला जाणार होता.
मात्र आता आरोपीच्या शिक्षेवर उद्या सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती.

 

नेमकं काय घडलं?

पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती.
यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली.
नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता.
पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले.
यात गंभीररित्या जळालेल्या पीडितेचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला.
या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.

 

Web Title :- Wardha Hingan Ghat Case | Wardha hinganghat woman lecturer set ablaze by jilted lover accused vikesh nagarale convicted court to pronounce sentence tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा