वर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार

वर्धा : शेगावहून नागपूरकडे जाणार्‍या महामार्गावर पुलगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यु झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातातील कारचा चक्काचुर झाला आहे. दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार असे मृत्यु पावलेल्यांची नाव आहे.

इंगोले कुटुंबीय हे नागपूरमधील हिंगणा परिसरातील रहिवासी होते. इंगोले कुटंबिय शेगावहून नागपूरकडे जात होते. त्यांची मुलगी गाडी चालवत होती. पहाटे पुलगाव जवळील मलकापूर शिवारात कारने पुढे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला. त्यांची मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात त्यांचे मृतदेह आणले असून तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.