पुरंदर मध्ये रविवारी वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारी (ता. १२) विवेकवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टने तिसऱ्या वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन केल्याची माहिती प्रा. धनंजय होनमाने यांनी दिली.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यास आश्रम वारी भैरवगडचे (अकोला) अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज वाघ संमेलनाध्यक्ष म्हणून तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय जगताप तसेच आमदार सुनील शेळके, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार अशोक टेकवडे, प्रमुख निमंत्रक माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे आहेत.

कण्हेरी मठाचे लक्ष्मण महाराज कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात संत साहित्य आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावर डॉ. विजय भटकर, वारकरी कीर्तन परंपरेचे सामाजिक योगदान या विषयावर जगन्नाथ महाराज पाटील, कीर्तन परंपरा – महाराष्ट्राचे सांस्कृतिक व वैभव या विषयावर ज्ञानेश्वर महाराज शिंदे, वारी परंपरा व कीर्तन परंपरा – एक अनुबंध यावर राजाभाऊ चोपदार यांचे व्याख्यान होणार आहे. महामंडलेश्वर बीडचे आचार्य डॉ. अमृतनाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. यावेळी प्रवीण महाराज गायकवाड यांचा अभंगवाणी कार्यक्रम होईल. बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाने संमेलनाची सांगता होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/