वारकरी महिलांना चिरडून फरार झालेला चालक अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

आषाढी वारीसाठी देहूगाव येथे येत असताना वेगातील टेम्पोची धडक बसल्याने दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर चालक न थांबता फरार झाला होता. अखेर एमआयडीसी पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d66539d8-90f7-11e8-846b-13f4adb262bf’]

पांडुरंग बबन पानमंद (४२, रा. राजगुरूनगर, खेड) या चालकास अटक केली आहे. तर जनाबाई अनंता साबळे आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले या दोन वारकरी महिलांचा चिरडून मृत्यू झाला आहे.  जनाबाई आणि सूनमबाई या दोघी बीड येथील एका दिंडी सोबत पायी देहूगाव येथे निघाल्या होत्या. दरम्यान मोशी येथून जात असताना रस्ता ओलांडताना एका अनोळखी टेम्पोची धडक बसली. चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे, कर्मचारी सुहास जगताप यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर चाकण परिसरातील २०६ वाहने, त्याचे मालक आणि चालक यांची तपासून करून हा गुन्हा उघडकीस आणला. तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.