सावधान ! ‘कोरोना’ व्हायरसमुळं पुरूषांच्या मृत्यूची शक्यता जास्त, नव्या संशोधनात खुलासा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस संक्रमणाबाबत रोज नवीन माहिती समोर येत असून आणखी एक धक्कादायक संशोधन समोर आले आहे. नव्या संशोधनात दावा केला गेला आहे की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त आहे. जगभरात आतापर्यंत जमा झालेल्या आकड्यांच्या आधारे सध्याच्या खुलासा सांगत आहे.

काय आहे नवीन संशोधनात?

आंतरराष्ट्रीय संस्था नॅशनल हेल्थ इन्स्टिटयूटने आपल्या संशोधनात खुलासा केला आहे की, जगात कोरोना व्हायरसने मरणाऱ्यांच्या संख्येत पुरुष जास्त आहेत. इटलीच्या आकड्यांनुसार, संस्थेने म्हटले कि कोरोनाने संक्रमित लोकांमध्ये ६० टक्के पुरुषच आहेत. म्हणजे इटलीत संक्रमित होणाऱ्यांमध्ये दर १० महिलांमध्ये पुरुषांचे प्रमाण १४ आहे. व्हायरसमुळे मरणाऱ्यांमध्ये केवळ ३० टक्के महिला आहेत तर ७० टक्के पुरुष आहेत.

हे संशोधन करणारे डॉक्टर डेबोरा ब्रिक्स यांचे म्हणणे आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त नशा करतात. उदा, महिलांच्या तुलनेत पुरुष धूम्रपान आणि ड्रिंकिंग जास्त करतात. याशिवाय निरोगी राहण्याच्या बाबतीतही पुरुष खूप सुस्तपणे असतात. याच कारणामुळे कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक प्रतिकारक शक्ती महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कमी असते.

या संशोधनातील महत्वपूर्ण माहिती

– कोरोना व्हायरसने मृत्यू

इटलीत मरणाऱ्यांमध्ये दर १० महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या २४ आहे.
चीनमध्ये मरणाऱ्यांमध्ये दर १० महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या १८ आहे.
जर्मनीमध्ये मरणाऱ्यांमध्ये दर १० महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या १६ आहे.

– कोरोनाची पॉजिटीव्ह प्रकरणे

इटलीत संक्रमित झालेल्यांमध्ये प्रत्येक १० महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या १४ आहे.
इराणमध्ये संक्रमित झालेल्यांमध्ये प्रत्येक १० महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या १३ आहे.

भारताने आतापर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित महिला आणि पुरुषांची संख्या सादर केलेली नसून यामुळे सध्या या संशोधनात आपल्या देशाला शामिल केले गेलेले नाही. पण संशोधकांना आशा आहे की, एकदा सगळ्या देशांकडून सूचना मिळाल्यावर जास्त अचूक माहिती उपलब्ध होऊ शकेल.