Alert ! चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय WhatsApp यूजर्स, पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून चोरत आहेत प्रायव्हेट डाटा

नवी दिल्ली : भारतात आपल्या नव्या यूजर डाटा पॉलिसीबाबत समस्यांना सामोरे जात असलेल्या इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअपच्या (whatsapp ) समोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. नवी दिल्लीच्या थिंक टँक सायबरस्पेस फाऊंडेशनने म्हटले आहे की, चीनचे हॅकर्स पार्ट टाइम जॉबचे प्रलोभन दाखवून भारतीय व्हॉट्सअप (whatsapp ) यूजर्सला निशाणा बनवत आहेत. व्हॉट्सअपवर येत असलेल्या मॅसेजमध्ये एक लिंक दिली जात आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, कुणीही व्यक्ती दररोज केवळ 10 ते 30 मिनिटे काम करून 200-3000 रुपयांची कमाई करू शकतो.

एक यूआरएल चीनची कंपनी अलीबाबा क्लाऊडशी संबंधीत
फाऊंडेशनने म्हटले की, व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात येत असलेल्या संदेशात अनेक लिंक अटॅच केल्या जात आहेत. अशा लिंक यूजर्सला एका कॉमन यूआरएलवर घेऊन जातात. यामध्ये प्रत्येक लिंक अनेक मॅसेजमध्ये पाठवल्या जात आहेत. असे आढळून आले आहे की, एकच लिंक सर्व दुसर्‍या प्रकारच्या लिंकसाठी वापरली जात आहे. या लिंक्स व्हॉट्सअपद्वारे प्रत्येक क्षेत्र आणि इंग्रजी सोडून प्रत्येक भाषेत री-डायरेक्ट केली जाऊ शकते. प्रत्येक लिंक यूजरला एका सोर्सपर्यंत घेऊन जाते. मात्र, एक लिंक दूसरा यूआरएल आणि नवीन आयपी अ‍ॅड्रेसवर घेऊन जात आहे, जी चीनची कंपनी अलीबाबा क्लाऊडशी संबंधित आहे.

फाऊंडेशनने लिंकच्या आयपी अ‍ॅड्रेसबाबत केला दावा
सायबरस्पेस फाऊंडेशनने सांगितले की, जेव्हा यूआरएलला मॅनिप्यूलेट केले जाते तेव्हा चीनी भाषेत एक एरर कोड डिस्प्ले होतो. तपासात आढळले की, याचे डोमेन नेम चीनमध्ये रजिस्टर्ड आहे. फाऊंडेशनने दावा केला आहे की, या लिंकचा आयपी अ‍ॅड्रेस 47.75.111.165 आहे. हा अलीबाबा क्लाऊड, हाँगकाँग आणि चीनमध्ये ट्रेस केला गेला आहे. ही बातमी अशावेळी आली आहे, जेव्हा व्हॉटसअप आपल्या यूजर्सला फेसबुकसोबत आपला वैयक्तिक डेटा सामायिक करण्याची परवानगी मागत आहे. असे न केल्यास यूजर्सचे व्हॉट्सअप अकाऊंट 8 फेब्रुवारी 2021 च्यानंतर बंद केले जाईल.