Alert : बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्र तर गुरूवारी कोकणात मुसळधार पाऊस, प्रशासनाला सतर्कतेचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पाऊस (rains) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. या स्थितीमुळेच राज्यात सध्या पूर्व किनारपट्टीसह सर्वत्र जोरदार पाऊस (rains) होत आहे.

असा आहे पावसाचा अंदाज

13 ऑक्टोबर
दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

14 ऑक्टोबर
मध्य महाराष्ट्रतील पुण्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता.

15 ऑक्टोबर
कोकणातील सर्व जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

मागील 24 तासात झालेला पाऊस
लांजा 120, राजापूर 100, देवगड, वैभववाडी 70, दोडामार्ग, कणकवली, वेंगुर्ला 60 मिमी पावसाची नोंद झाली. जत 140, विटा 90, कडेगाव 80, पंढरपूर, शेवगाव 70 मिमी पाऊस झाला. सेलू 120, घनसावंगी, मंठा, परतूर 80, कळमनुरी, शिरुर कासार 70 मिमी पाऊस. विदर्भात मंगळुरपीर 80, दारव्हा 50 मिमी पावसाची नोंद झाली.