५ कोटीचा धनादेश न वटल्याप्रकरणी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याविरूध्द वॉरंट

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख)- दौंडचे विद्यमान आमदार आणि भीमा पाटस सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्याविरुद्ध दौंड न्यायालयाने वॉरंट काढल्याने खळबळ माजली आहे. भीमा पाटस कारखाण्यासाठी स्टेटबँकेचे घेतलेल्या कर्जप्रकरणी ५ कोटींचा धनादेश न वटल्याने हे वॉरंट काढण्यात आले आहे.

स्टेट बँकेला कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी आमदार राहुल कुल यांना न्यायालयाने समन्स बजावूनही ते न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाचे वॅारंट बजावण्यात आले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याने २०१५ – २०१६ या गळित हंगामाकरिता दौंड शहरातील स्टेट बँकेचे कर्ज घेतले होते. बँकेने वेळोवेळी मागणी करूनही सदर कर्जाची व्याजासह परतफेड करण्यात आली नव्हती.

दरम्यान ९ मे २०१८ रोजी कर्जापोटी कारखान्याने ५ कोटी रूपयांचा धनादेश स्टेट बँकेला दिला होता. परंतु सदर धनादेश न वटता परत आल्याने बँकेच्या वतीने स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी दौंड न्यायालयात दाद मागितली होती. सदर फौजदारी खटल्यात समन्स बजावूनही कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल, कार्यकारी संचालक अशोक पाटील व संचालिका श्रीमती नंदा गुणवरे हे न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरूध्द जामीनपात्र वॅारंट बजावण्यात आले आहे तर पंढरीनाथ पासलकर, तुकाराम अवचर, विनोद गाढवे, महेश शितोळे, व निर्मला कदम या पाच संचालकांना समन्स बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त-

पाणी आणि मिठाने दूर करा ‘या’ १० सौंदर्य समस्या
यकृत निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स
लाइफ सपोर्ट सिस्टिमवर व्यक्ति जिवंत राहू शकते काय ?