बाळा, तुझ्या जन्माअगोदरपासून मी शतक झळकावतोय, मैदानातच आफ्रिदी अन् अफगाणी खेळाडूत जुंपली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   श्रीलंकेत सुरु असलेल्या प्रमिअर लिग स्पर्धेत सध्या जगभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. सोमवारी कँडी विरुद्ध गॅले या संघामध्ये झालेल्या सामन्यात माजी पाकिस्तानी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि युवा अफगाणी खेळाडू नवीन उल-हक यांच्यात भर मैदानातच जुंपलेली दिसून आली. कँडीच्या संघाने गॅले संघावर मात करत स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला आहे. सामना संपल्यानंतर शाहिद आफ्रिदीने नवीन उल-हकला, बाळा तुझ्या जन्माआधीपासून मी शतक झळकावतोय (Baby before you are born I’m flashing a century) असे म्हणत त्याची बोलती बंद केली. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीच्या या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

कँडी टस्कर्स संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल-हक आणि गॅले संघाचा मोहम्मद आमिर आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात जुंपल्याचे दिसून आले. नवीन टाकत असलेल्या 18 व्या षटकात मोहम्मद आमिरने चौकार लगावला. यानंतर शाहिद आफ्रिदीदेखील यात सहभागी झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहिद आफ्रिदीच्या चेहऱ्यावर नवीन उल-हक साठी असणारे भाव पाहण्यासारखे होते.

You might also like