‘त्यावेळी सचिनला बाद केल्याचं खूप दुःख झालं’, ‘या’ बॉलरनं सांगितलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 24 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मो़डले आहेत. भल्याभल्या गोलंदाजांची त्याने धुलाई केली. सचिनला बाद करणे हे त्याच्या काळातील प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न होते. त्यातच विश्वचषक स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा असेल, तर प्रतिस्पर्धी संघाचा सचिनला बाद करण्याचा आनंद द्विगुणित व्हायचा. पण एका विश्वचषकात सचिनला बाद केल्याचे वाईट वाटले अशी खंत माजी पाकिस्तानी खेळाडूने बोलून दाखवली.

2003 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरोधात भारताकडून खेळताना सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी केली. पण शोएब अख्तरच्या एका बाऊन्सर चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यामुळे तेंडुलकर आणि भारतीय चाहत्यांना खूपच वाईट वाटले . पण त्याचसोबत सचिनला बाद करणार्‍या अख्तरलादेखील त्यावेळी सचिनचे शतक हुकल्याचे वाईट वाटल्याचे एका वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. सचिन 98 धावांवर बाद झाला तेव्हा मला खूप वाईट वाटले होते.

त्याची खेळी खूपच खास होती, त्यामुळे त्या खेळीत त्याने शतक झळकवायला हवे होते. मला स्वत:लासुद्धा सचिनचे शतक व्हावे असे वाटत होते. मला त्याने आधी एकदा बाऊन्सर चेंडूवर षटकार लगावला होता, त्यामुळे मी त्याला बाऊन्सर चेंडू टाकला. त्यावर सचिन षटकार ठोकेल असे वाटले. पण तो बाद झाला, असे अख्तर म्हणाला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like