Washim ACB Trap | 9 हजार रुपये लाच घेताना पोलीस पाटील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – मी पोलीस पाटील असून तुमच्या मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी लागणारे कागदपत्रे लवकर कोर्टात पाठवतो असे प्रलोभन दाखवून 20 हजाराची लाच मागितली. त्यापैकी 9 हजार रुपये लाच घेताना पोलीस पाटील प्रकाश कळणू धांडे (वय-57 रा. खडकी) याला वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Washim ACB Trap) सापळा रचून ताब्यात घेतले. वाशिम एसीबीच्या पथकाने (Washim ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.2) रिसोड येथील हिगोली नाका येथे केली.

 

याबाबत 65 वर्षाच्या व्यक्तीने गुरुवारी (दि.1) वाशिम एसीबीकडे (Washim ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार यांच्या मुलावर रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो सध्या जेलमध्ये आहे. आरोपी प्रकाश धांडे याने तक्रारदार यांना मी पोलीस पाटील असून माझी पोलीस ठाण्यात चांगली ओळख असल्याचे सांगितले. तसेच मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात लवकर जामीन होण्यासाठी लागणारी कागदपत्रे लवकर कोर्टात पाठवतो असे प्रलोभन दाखवून 20 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी वाशिम एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

 

वाशिम एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस पाटील प्रकाश धांडे याने तक्रारदार यांच्या मुलाच्या जामिनासाठी लागणारे कागदपत्र न्यायालयात लवकर पाठवण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागितले. तडजोडी अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले. शुक्रवारी हिंगोली नाका येथील एसबीआय बँकेसमोर पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ठरलेल्या 10 हजार रुपयांपैकी 9 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारोति जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे,
वाशिम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेलके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोसले,
सुजित कांबळे, पोलीस अंमलदार विनोद मारकंडे, नितीन टवलारकर, आसीफ शेख, राहुल व्यवहारे, योगेश खोटे,
रवींद्र घरत चालक शेख नावेद यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Washim ACB Trap | Police Patil in anti-corruption net while accepting bribe of 9 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..