Washim Accident News | वाशिममध्ये मोठी दुर्घटना! ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षा पलटी होऊन दोघांचा मृत्यू

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन – Washim Accident News | वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर-अकोला मार्गावर पार्डी ताड फाट्यावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने उभ्या असलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात (Washim Accident News) घडला आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
पार्डीताड येथील 14 मजूर काल हरभरा जमा करण्यासाठी शेतात गेले होते. ते दिवसभराचे काम आटोपून सायंकाळच्या सुमारास घरी परतण्यासाठी ऑटोत बसले होते. यादरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने उभ्या असलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शिवदर्शन नंदू लांभाडे (वय 24 वर्ष) व ऑटोत बसलेल्या लिलाबाई दत्ता लांभाडे (वय 45 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे
प्रियंका डिगंबर लांभाडे (वय 12 वर्ष), रवी मारोती गावंडे (वय 30 वर्ष), शारदा अनिल मुरकुटे (वय 25 वर्ष), लता मुरलीधर लांभाडे (वय 50 वर्ष), वछला हरिभाऊ जटाळे (वय 55 वर्ष), ऋतिका प्रकाश टोंचर (वय 13 वर्ष), रुखमाबाई लक्ष्मण लांभाडे (वय 62 वर्ष) सर्व राहणार पार्डीताड हे गंभीर जखमी झाले आहेत. यामधील प्रियांका लांभाडे व रवी गावडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Washim Accident News)

 

या अपघातात मृत पावलेल्या शिवदर्शन नंदू लांभाडे याचे येत्या 13 मार्च रोजी गावातीलच तरुणी सोबत लग्न होणार होते.
मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. लग्नाच्या अगोदरच त्याचा अपघातात मृत्यू झाला.
निर्व्यसनी व मेहनती असलेल्या शिवदर्शनचे गावातीलच निकिता ज्ञानेश्वर टोंचर या तरुणीशी लग्न होणार होते.
तर दुसरीकडे मृत लिलाबाई दत्ता लांभाडे यांच्या पतीने दहा वर्षांपूर्वी आजाराला कंटाळून आत्महत्या केली होती.
यानंतर लिलाबाई यांनी मोठ्या मेहनतीने दोन मुली व दोन मुलांचा सांभाळ केला होता.
त्यामुळे आता बापाच्या छत्रानंतर आईचेही छत्र हरपल्याने मुले पोरकी झाली आहेत.

 

Web Title :- Washim Accident News | today washim tractor hits auto rickshaw two passengers dies on the spot groom died 10 days ahead of wedding

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले