
Washim News | 7 मुलींनी आईला दिला खांदा अन् केले अंत्यसंस्कार, मुलींचे क्रांतिकारी पाऊल
वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – Washim News | आई किंवा वडील यांच्या चितेला मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे. मात्र आईच्या निधनानंतर सात मुलींनी (Girl) अंत्यसंस्कार (Funeral) करत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. तिरडीला खांदा देण्यापासून ते चितेला मुखाग्नी देण्यापर्यंतचे सर्व विधी त्यांनीच केले. वाशिम जिल्ह्यातील (Washim News) मंगरूळपीर शहरात रावपलाई परिवारातील मुलींनी शुक्रवारी (दि.2) समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
मंगरुळपीर (Mangrulpir) शहरातील कुंभकार समाजातील सुमनबाई गेंदुलाल रावपलाई यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन (Passed Away) झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि सात मुली आहेत. आईचे निधन झाल्याने त्यांच्या सातही मुली अंत्यदर्शनासाठी आल्या आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. (Washim News)
या सातही मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला. मुलींनी या कृतीतून मुला-मुलींमधील भेदभाव नाहीसा करत
समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. तसेच या सात मुलींनी आईच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार केले.
Web Title :- Washim News | 7 girls shouldered their mother and performed last rites, revolutionary step of girls
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | 22 वर्षाच्या तरुणीवर केला लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द FIR
MP Vinayak Raut | ‘… तर हे 40 आमदार एकमेकांच्या उरावर बसतील’, शिवसेना खासदाराचा दावा
Ganeshotsav 2022 | आफ्रिकेत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, असा वाजवला नगारा; व्हिडिओ करेल आश्चर्यचकित