Washim News | कौतुकास्पद ! वाशिममधील हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – Washim News | अलीकडे चांगलं शिक्षण आणि नोकरीसाठी घरची आर्थिक परीस्थीती उत्तम असायला हवी अशी ओरड असतानाच, दुसरीकडे मात्र वाशिम (Washim News) जिल्ह्यातील कांरजा (Karanja) मधील एका हमालाच्या मुलाने (Son Of Porter) नेव्ही मर्चंन्टमध्ये (Merchant Navy) इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफीसर सारख्या महत्वाच्या पदाला गवसनी घालुन जिद्द, चिकाटी मेहनतीला पर्याय नाही हे दाखवुन दिलय. कांरजा येथील शिवाजीनगरातील नितेश चंद्रकांत जाधव (Nitesh Chandrakant Jadhav) याने नुकतीच इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफीसर पदाची परीक्षा उत्तीर्ण केली असून येत्या जुन महिण्यात तो त्या पदावर रूजु होणार आहे. (Nitesh Chandrakant Jadhav Become Officer In Merchant Navy)

 

नितेशचे वडील चंद्रकांत जाधव हे कांरजा बाजारसमितीत हमालीचे काम करीत असुन आई गृहिणी आहे. त्यांच्या घरची आर्थिक परीस्थिती तशी बेताचीच. पण मुलांनी शिकून नोकरी करावी यासाठी त्यांची धडपड असते. नितेशने कांरजा येथिल न. प. शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर बी ई इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली आणि इतरांप्रमाणे शासकीय सेवेत नाेकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे शासकिय सेवेत नाेकरी मिळणे कठीण असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने सप्टेंबर 2021 मध्ये ही परीक्षा दिली आणि त्यात 81 टक्के गुण संपादन केले. (Washim News)

आता नेव्ही मर्चंन्टमधील या नेाकरीसाठी त्याला दोन लाख रूपये प्रतिमहिना वेतन मिळणार असुन
जहाजावरील इलेक्ट्रिकची कामे त्याला करावी लागतील.
यासाठी त्याला कोणाचेही मार्गदर्शन लाभले नसून त्याने इंटरनेटलाच मार्गदर्शक मानुन शिक्षण ते नेाकरी असा प्रवास पुर्ण केलाय.
कांरजातील नितेश जाधवची जिद्द, चिकाटी व मेहनत प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारून शिक्षणाची वाट धरल्यास
नोकरी मिळत नाही असे म्हणण्याची वेळ येणार नाही एवढे नक्कीच.

 

Web Title :- Washim News | Son Of Porter Nitesh Chandrakant Jadhav Become Officer In Merchant Navy In Washim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा