राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन –  वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन मारहाण केल्याचा आरोप पोलीस निरीक्षकावर करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्याने वाशिम पोलीस (Washim Police) दलात एकच खळबळ उडाली आहे.

Corona Vaccination : पुण्यात लसीकरण ‘सुपरफास्ट’ ! आतापर्यंत 11 लाख जणांना दिला ‘डोस’, ‘रिकव्हरी रेट’ देशात ‘अव्वल’

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस  यांनी वाशिम पोलीस (Washim Police) ठाण्यात फिर्याद (Complaint) दिली आहे.
यानुसार आरोपी विश्वकांत गुट्टे यांच्यावर कलम 376 सह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फायद्याची गोष्ट ! फक्त 100 रुपयांत LIC चा 75 हजारांचा विमा ‘कव्हर’, जाणून घ्या

ओळखीचा फायदा घेऊन केला बलात्कार

वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
तेव्हा महिला पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्यासोबत ओळख झाली.
त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी वाशिममध्ये आरोपी घरी आला असता त्यांनी जबरदस्ती करत बलात्कार करुन मारहाण  केली. (Female Police officer Raped and Beaten)

स्पर्म डोनेशनद्वारे जन्मलेल्या मुलीने शोधले आपले 63 भाऊ-बहिण, आता अशी होते सर्वांची भेट

गुरुवारी गुन्हा दाखल

याप्रकरणी गुरुवारी (दि.3) रात्री महिला पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करीत आहेत.
अशी माहिती पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितली.

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस

Pune News : खंडणी मागण्याची अनोखी पद्धत, स्पीड पोस्टने मागितली 20 लाखाची मागणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार