जेव्हा वसीम अकरमने उडवली विव रिचर्डसची कॅप, ड्रेसिंग रूममध्ये मिळाली जीवे मारण्याची ‘धमकी’

नवी दिल्ली : डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अकरमचे नाव जगातील महान गोलंदाजांमध्ये सहभागी आहे. रिव्हर्स स्विंगचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने वनडे क्रिकेटमध्ये 502 विकेट घेतल्या होत्या. वसीम अकरमचा आज (3 जून) वाढदिवस आहे आणि तो 54 वर्षांचा झाला आहे.

वसीम अकरमचा वेस्टइंडीजचा प्रसिद्ध फलंदाज विव रिचर्डससोबतचा एक प्रसंग खुपच भयंकर होता. या गोष्टीचा खुलासा स्वत: वसीमने केला होता, जेव्हा विव रिचर्डसची कॅप उडवणे त्याला खुप महागात पडले होते.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरमने खुलासा केला होता की, एकदा क्रिकेटच्या मैदानावर वेस्टइंडीजचा फलंदाज सर विवियन रिचर्डसचे स्लेजिंग करणे खुप महागात पडले होते.

यानंतर विव रिचर्डसने वसीम अकरमला ड्रेसिंग रूममध्ये जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. वसीम अकरमने खुलासा केला होता की, एकदा क्रिकेटच्या मैदानावर सर विवियन रिचर्डसला त्याने स्लेजिंग केले होते.

वसीम अकरमने सांगितले की, विव रिचर्डससारख्या फलंदाजाच्या वाटेला जाणे सोपे नाही. 1988 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीम वेस्टइंडीज दौर्‍यावर बारबाडोस टेस्ट मॅचनंतर विव रिचर्डस एवढा रागावला की ती त्याने वसीम अकरमला मारण्याची धमकी दिली.

विव रिचर्डसने त्या टेस्ट मॅचमध्ये वसीम अकरमच्या अनेक चेंडूंची जोरदार ठोकमपट्टी केली होती. रिचर्डस उंचपुरा धिप्पाड होता तर अकरम एकदम सडपातळ होता.

मॅचची शेवटची ओवर सुरू होती आणि वसीम अकरम गोलंदाजी करत होता. वसीम अकरमला तेव्हा जाणवले की तो खुपच वेगवान झाला आहे.

विव रिचर्डलाही जाणवले की अकरम एक अवघड गोलंदाज आहे. त्याच्याकडे एक वेगवान आर्म अ‍ॅक्शन आहे. अकरमने रिचर्डसला एक बाउन्सर टाकला आणि त्याची कॅप जमीनीवर पाडली. रिचर्डसची कॅप पडणे खुप मोठी गोष्ट होती.

वसीम अकरमने सांगितले की, तेव्हा कोणीही मॅच रेफरी नसायचे. अशात मी रिचर्डसच्या जवळ गेलो आणि मोडक्या-तोडक्या शब्दात स्लेजिंग केली. रिचर्डसने माझ्याकडे रागात पाहिले आणि म्हटले मॅन, हे करू नकोस. मला मॅन शब्दा शिवाय आणखी काही समजले नाही. मी म्हटले ओके.

वसीम अकरमने सांगितले, नंतर मी इम्रान खानजवळ गेलो आणि त्याला सांगितले की, विव मला सांगत आहेत की, त्यांना स्लेज करू नको, नाही तर ते मला मारतील. मग इम्रानने मला म्हटले चिंता करू नको आणि बाऊंसरच टाक. यानंतर वसीमने पुन्हा त्यांना बाउंसर टाकला आणि स्लेजसुद्धा केले. दिवसाच्या शेवटच्या चेडूवर ते बाद झाले तेव्हा वसीमने ओरडून विवला फिल्डच्या बाहेर जाण्यास सांगितले.

अकरमने सांगितले की, मी इम्रानच्या सोबतच ड्रेसिंग रूममध्ये आलो आणि शूज काढू लागलो. तेवढ्यात कुणीतरी ड्रेसिंग रूमच्या बाहेर येण्यास सांगितले. जेव्हा बाहेर गेलो तेव्हा पाहिले की, विव रिचर्डस शर्ट न घालता घामाघुम झालेल्या स्थितीत रागाने लालभुंद होऊन हातात बॅट घेऊन उभे होते.

विव रिचर्डने पॅडसुद्धा घातले होते. यानंतर अकरम घाबरून इम्रानच्या जवळ गेला. इम्रानने अकरमला बाजूला घेतले. नंतर बाहेर जाऊन अकरमने विवची माफी मागितली आणि म्हटले की असे पुन्हा होणार नाही. यानंतर विव रिचर्डस यांनी म्हटले की, हेच चांगले होईल, नाही तर मारून टाकेन.

वसीम अकरमने वनडे क्रिकेटमध्ये 502 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 414 विकेट घेतल्या आहेत. त्याने बॅटिंगमध्ये सुद्धा कमाल केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 2898 आणि वनडेमध्ये 3717 रन केल्या आहेत. वसीम पाकिस्तान टीमचा कर्णधारही होता.2002 मध्ये विजडनने त्याला वनडे क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज घोषित केले हेाते. वसीम पाकिस्तानचा सर्वात यशस्वी क्रिकेटर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like