‘त्या’ दहा रणजी विजेतेपद मिळवणारा ‘खास’ खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्तरावरच्या दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना फारशी लोकप्रियता पण याला अपवाद आहे तो म्हणजे वसीम जाफर. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीद्वारे अनेक विक्रम करणाऱ्या वसीम जाफरचा आज वाढदिवस आहे.  मुळचा मुंबईचा असलेला वसीम सध्या विदर्भाकडून रणजी खेळत आहे. काही दिवसांपुर्वी त्याने सलग दुसरे रणजी विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे वसीमचे हे दहावे रणजी विजेतेपद आहे.

मागील काही दशकांच्या काळात आठ वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबई संघात वसीम जाफरचा समावेश होता. सलग दोन वेळा विजयी मिळवणाऱ्या विदर्भ संघात देखील जाफर खेळत होता. विदर्भाला ही दोन्ही विजेतेपद मिळवून देण्यात जाफरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सलामीवीर जाफरने आतापर्यंत दहा अंतिम सामने खळले आहे आणि दहा वेळा रणजी विजेतेपद आहे. यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने ११ सामन्यात ६९.१३ च्या सरासरीने १ हजार ३७ धावा केल्या. यात ४ शतकांचा समावेश आहे

जाफरने प्रथम श्रेणीमधील दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे २००० मध्ये भारतीय कसोटी संघात त्याची निवड झाली. फेब्रुवारी २००० मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून केवळ २ धावा केल्या. कसोटीमध्ये पहिले शतक करण्यास त्याला ६ वर्ष वाट पहावी लागली. अर्थात त्यानंतर त्याने कसोटीमध्ये द्विशतक देखील केले.

आता पर्यंतच्या कारर्किद वसीम जाफरने प्रथम श्रेणी २५३ सामन्यात १९ हजार १४७ धावा केल्या आहेत, ८८ अर्धशतके केले .आंतरराष्ट्रीय कसोटीत जाफरने ३१ सामन्यात १ हजार ९४४ धावा केल्या असून त्यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याने २ विकेटसुद्धा घेतल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत केवळ २ सामने खेळले, त्यात त्याच्या नावावर केवळ १० धावा आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us