‘या’ देशाच्या टीममधील क्रिकेटर्संना आता ‘बिर्याणी’ बंद, क्रिकेट बोर्डाचा निर्णय

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – विश्वचषक स्पर्धेमध्ये सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पाकिस्तानच्या संघावर फिटनेसवरून बरीच टीका झाली. मात्र, आता मागचे सगळे विसरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या फिटनेस बाबत गांभीर्याने घेतले आहे. त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी डायट प्लान तयार केला आहे. डायट प्लान नुसार किक्रेट खेळाडूंना आता जेवणात बिर्याणी मिळणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान म्हणाले की, बिर्याणी आणि डाळ तांदळाच्या व्यतिरिक्त खेळाडूंनी काय खावे, यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे बिर्याणी आणि डाळ व्यतीरिक्त खेळाडूंना कोणते पौष्टीक पदार्थ देता येतील याकडे जास्त लक्ष दिले जाणार आहे. खेळाडूंची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वसीम खान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

पुढे बोलताना वसीम खान म्हणाले, प्रत्येकवेळी लोकांकडून खेळाडूंवर टीका करण्यात येते. तसेच खेळाडू दबावात येत असल्याचे बोलले जाते. मात्र, आमची कामगिरी चांगली असल्याचे त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितेल. तसेच पाकिस्तान हा एक मजबूत संघ असून आणि आता आम्हाला पुन्हा एकदा जोमाने खेळावे लागणार असल्याचे सांगून संघाला एक क्रिडा सायकॉलॉजिस्टची गरज असल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त