भारत-चीन तणावादरम्यान लडाखमध्ये 17,000 फुटावर ITBP जवानांनी फडकवला ‘तिरंगा’, पहा Video

नवी दिल्ली : भारत-तिबेट सीमा पोलीसांच्या जवानांनी लडाखमध्ये 17,000 फुट उंचीवर स्वातंत्र्य दिवस साजरा केला. आयटीबीपीने आपल्या जवानांचा लोकप्रिय देशभक्ती गीताचा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओ आयटीबीपीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर जारी केला आहे. याशिवाय भारत-तिबेट सीमा पोलीस सैनिकांनी लडाखच्या पँगोंग त्सो सरोवराच्या किनारी 14,000 फुट उंचीवर सुद्धा देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. सैनिकांनी आयटीबीपीचा झेंडा तिरंगा झेंड्यासह फडकवला.

पूर्व लडाखमध्ये चीनी लष्कराशी सामना करणार्‍या एकुण 294 जवानांना शुक्रवारी डायरेक्टर जनरल सन्मान पत्र आणि पदकाने सन्मानित करण्यात आले. आयटीबीपीने त्या 21 जवानांची नावे गृह मंत्रालयाला पाठवली आणि शौर्य पदकासाठी शिफारस केली आहे. आयटीबीपीचे डीजी एस एस देसवाल नं 6 अन्य जवानांना छत्तीसगढमध्ये नक्षलींविरूद्धच्या अभियानासाठी डी जी सन्मान पत्र आणि पदक प्रदान केले.

आयटीबीपीने सांगितले की, कशाप्रकारे त्यांच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी आयुष्य पणाला लावले आणि चीन्यांना धडा शिकवला. जवानांनी आपल्या युद्ध कौशल्याची साक्ष देत अटीतटीचा संघर्ष केला. आयटीबीपीच्या जवानांनी संपूर्ण रात्र चीनी सैनिकांशी सामना केला आणि 17 ते 20 तास त्यांना रोखले होते.

या हिंसक हाणामारीत भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. चीनचे सुद्धा 40 जवान यामध्ये शहीद झाले. यासोबत आयटीबीपीने आपल्या 318 जवानांची नावे आणि आणखी 40 अन्य केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांची नावे केंद्रीय गृह मंत्री स्पेशल ऑपरेशन ड्यूटी मेडलसाठी पाठवली आहेत. ज्यांनी महामारी कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी आणि अन्य प्रयत्नात महत्वाची भूमिका बजावली आहे.