बॉलिवूडच्या गाण्यावर पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत फारुख अब्दुल्ला थिरकले, पहा व्हिडीओ

चंदीगढ : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यावेळी ते बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसले. त्यांचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजकीय लोकांवर समाजाचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांना नेहमी वावरताना काळजी घ्यावी लागते. मात्र, काही क्षण असेही असतात ते अगदी खुलेपणाने वावरताना दिसतात. असंच काहीसं चित्र चंदीगडमध्ये पहायला मिळालं

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला बॉलिवूडच्या एका जुन्या गाण्यावर नाचताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 83 वर्षीय फारुख अब्दुल्ला हे ‘तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग देखील दिसत आहेत.

चंदीगढमध्ये मोठ्या उत्साहात अमरिंदर सिंह यांची मुलगी रनिंदर सिंह यांच्या मुलीचा सेहरिंदर कौरचा विवाह संपन्न झाला. त्यावेळी केलेल्या डान्सचा हा व्हिडीओ लोकप्रिय ठरला आहे. या व्हिडिओत ‘तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ आणि ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’ या गाण्यावर फारुख अब्दुल्ला आणि अमरिंदर सिंह नाचताना दिसत आहेत. ही दोन्ही गाणी मोहम्मद रफी यांनी 70 च्या दशकात गायली होती.