खुशखबर ! आता रेल्वेत पाहा मनाला वाटेल तो ‘सिनेमा’ अन् ‘व्हिडीओ’, सरकार देणार नवी सुविधा

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाश्यांसाठी 2022 पासून प्रवास करणे आणखी आरामदायक आणि मनोरंजनात्मक असणार आहे. कारण आता रेल्वेमधून प्रवास करताना प्रवासी कोणत्याही अडथळ्याशिवाय चित्रपट आणि व्हिडीओ पाहू शकणार आहेत. मंगळवारी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

सरकारी दूरसंचार कंपनीने रेल्वे आणि स्थानकांवरील मागणीनुसार (सीओडी) सामग्री पुरवण्यासाठी झी एंटरटेनमेंटच्या सहाय्यक मेसर्स मार्गो नेटवर्कची डिजिटल एंटरटेनमेंट सर्व्हिस प्रोव्हाईडर (डीईएसपी) म्हणून निवड केली आहे.

पुढील दोन वर्षात सुरु होणार सेवा
रेलटेलने म्हंटले आहे की, पुढील दोन वर्षांमध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व प्रीमियम / एक्सप्रेस / मेल यांच्यासह उपनगरातील रेल्वे गाड्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होईल. यामध्ये चित्रपट, शो, शेक्षणिक कार्यक्रम अशा अनेक गोष्टी निशुल्क आणि शुल्क अशा दोनीही प्रणालीत उपलब्ध असतील. दोनीही प्रणाली दहा वर्षांच्या कालावधींसाठी सुरु असतील. ज्यामध्ये अंमलबजावणीचे पहिले दोन वर्ष देखील सामील आहेत.

या प्रकल्पांतर्गत रेलटेल आधीपासूनच गाड्यांमध्ये बसविलेल्या मीडिया सर्व्हरद्वारे चालत्या गाड्यांमध्ये विविध प्रकारची बहुभाषिक सामग्री (चित्रपट, संगीत व्हिडिओ, सामान्य करमणूक, जीवनशैली) इत्यादी उपलब्ध करून देईल.

यात्रेकरूंना मिळणार ही सुविधा
सीओडी ई-कॉमर्स किंवा एम-कॉमर्स आणि ट्रॅव्हल बुकिंग (बस, कॅब, ट्रेन) इत्यादी सुविधा देखील देईल आणि त्याबरोबरच डिजिटल मार्केटींगच्या क्षेत्रातील अन्य नाविन्यपूर्ण उपायही यासाठी वापरले जातील. यामुळे प्रवासात मोबाइला नेटवर्क नसले तरी प्रवाशी चांगल्या मनोरंजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/