‘आय sss  जाऊ दे न व’… ‘नाळ’ चा झाक ट्रेलर एकदा बघाच 

मुंबई : वृत्तसंस्था – नागराज  मुंजळे आणि चित्रपटात नवीन प्रयोग  हे समीकरण ठरलेलेच आहे. गेले कित्येक दिवसांपासून नागराजचा प्रत्येक चाहता त्याच्या नवीन सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशांनंतर नागराज मंजुळेंचा ‘नाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लाँच करण्यात आला. लहानपणाची आठवण करुन देणारा हा ट्रेलर अनेक लोकांच्या पसंतीस उतरला आहे. श्रीनिवास पोकळे या चिमुकल्याने साकारलेला ‘चैतन्य’ ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे.

चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

‘नाळ’ चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील संवाद खुद्द नागराज मंजुळे यांनी लिहिले आहेत. लहान मुलाचे विश्व आणि त्याची निरागसता या सिनेमात पाहायला मिळणार आहे.‘नाळ’ हा चित्रपट आठ वर्षांचा मस्तीखोर मुलगा चैतन्यवर आधारित आहेत. महाराष्ट्रातील दुर्गम भागात नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात चैतन्य राहतो. श्रीनिवास पोकळेने चैतन्यची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात चैतन्यच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी साकारली आहे. तर चैतन्यचे भावनिक विश्व, त्याचा खोडकर स्वभाव आणि शेवटी अनपेक्षित वळण, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे ट्रेलरमधून दिसते.

चित्रपटाचा २ मिनिटे १८ सेकंदाचा ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा चित्रपट प्रत्येकाला लहानपणाची आठवण करुन देणारा असेल, नाळ नात्याला जोडलेली अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून ट्रेलर पाहून चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 ‘आय sss  जाऊ दे न व…’ गाण्याचा रेकॉर्ड –

 

‘नाळ’ या सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘जाऊ दे न व…’ असे या गाण्याचे नाव आहे. या सिनेमातील लहान मुलगा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.  नाळच्या या पहिल्या गाण्याचे लिरिक्स देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. यू ट्यूब वर हे गाणं आत्तापर्यन्त २. ३ मिलियन लोकांनी पहिल आहे. तसेच अनेक लोक या गाण्याच व ट्रेलरच  व्हाट्सअप स्टेटस ठेवत आहेत.

जाहीरात