#VideoViral : धोनीची लाडकी जीवा ड्वेन ब्रावोसोबत करतेय मस्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएल 2019 ला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही चेन्नई सर्वांना भारी भरताना दिसत आहे. काल झालेल्या मॅचमध्ये चेन्नईने कोलकाताला हरवत चेन्नई सध्या टॉपला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा फॅन फॉलोविंग वारंवार वाढताना दिसत आहे. प्रत्येकजण या टीमवर जीव ओवाळताना दिसत आहे. अशातच कॅप्टन धोनीची मुलगी जीवा सध्या सोशलवर चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे.

धोनीची लाडकी जीवा हिचा क्युट आणि गोड अंदाज सर्वांनाच मोहित करतो. जीवा कधी तिच्या वडिलांना चिअर करतानाही दिसते. कधी कधी ती मॅच झाल्यानंतर बाकी खेळाडूंसोबत मस्ती करतानाही दिसून येते. जीवाचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत जीवा ड्वेन ब्रावोसोबत मस्ती करताना दिसत आहे.

नंतर धोनी हसत हसत आपल्या लाडकी पाशी येताना दिसत आहे. त्यात धोनी जीवाला बघताच खूप खुश होताना दिसत आहे. दोघांना मस्ती करताना पाहून धोनीलाही आनंद होताना दिसत आहे. जीवा ड्वेनच्या टोपीसोबत खेळताना दिसत आहे. जीवा खूपच गोड दिसत आहे. ड्वेन जीवाला उचलून घेतानाही दिसत आहे.

Loading...
You might also like