अविश्वसनीय ! 5 वर्षाच्या पठ्यानं एका मिनिटांत फोडल्या 125 ‘टाईल्स’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही कधी ब्रुस लीचे सिनेमे पाहिलेत. त्यात तो अनेक करामती करताना दिसतो जे सामान्यासाठी कदाचित अशक्य असतात. त्यात तो आपल्या कराटेच्या माध्यमातून काहीना काहीतरी फोडताना आणि शत्रूशी दोन हात करताना तुम्ही अनेक सिनेमातून पाहिले असेल. परंतु भारतात देखील असाच एक ब्रुस ली आहे, परंतु सोशल मिडियावर याची चर्चा छोटा ब्रुस ली म्हणून होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. हा ब्रुस ली वयानेच लहान आहे.

नागपूरच्या 5 वर्षीय राघव भांगडे चिमुरड्यानं कराटेमध्ये वेगळाच विश्वविक्रम रचला आहे. के जी 2 चा विद्यार्थी असलेल्या राघवनं सी पी बेरार शाळेत आयोजित विशेष प्रात्याक्षिक कार्यक्रमात विक्रम रचला. राघवने 1 मिनिटात 125 टाईल्स फोडून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. त्यामुळे भले भले ही थक्क झाले.

राघव अडीच वर्षांच्या असल्यापासून त्यांच्या आई वडिलांनी त्याला कराटे क्लास लावला. त्याचे वय लक्षात घेऊन त्याचा प्रवेश नाकरण्यात आला, परंतु नंतर पालकांच्या आग्रहाखातेर राघवला प्रवेश मिळाला. या लहान वयाच राघवने शिस्तने, मेहनतीने कराटेचे धडे घेतले.

कराटेतील त्याची आवड पाहून इच्छा शक्ती पाहून प्रशिक्षक विजय गिचरे यांनी त्याला वेगळ्या कार्यक्रमातून शिक्षण दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राघवने जोरदार मेहनत घेतली. त्याने 1 मिनिटात 125 टाईल्स फोडल्याने त्याच्या या कामगिरीच विविध स्तरावरुन कौतूक होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/