‘सरदार उधम सिंह’च्या बायोपिक मध्ये ‘असा’ असेल ‘उरी’च्या मेजर शेरगीलचा ‘लुक’, जाणून घ्या ‘रिलीज’ डेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कमी कालावधीत अभिनेता विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. विकीने गेल्या काही चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. विकीने यावर्षीचा सुपरहिट चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ मध्ये शानदार भूमिका साकारली होती. आता विकी क्रांतीकारी ‘सरदार उधम सिंह’ यांच्या बायोपिक मध्ये काम करत आहे. या चित्रपटात विकीचा लुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

‘सरदार उधम सिंह’ चित्रपटात विकी महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यााठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

@rohanshrestha 📷

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

हा बायोपिक सरदार उधम सिंह यांच्या बहुरंगी जीवनावर बनवला जात आहे. त्यांनी इग्लंडला जाऊन माइकल ओ डायरचा मृत्यू केला होता. डायर १९१९ मध्ये पंजाबचा गव्हर्नर होता. ज्यावेळी जालियनवाला बागची हत्याकांडची घटना घडली होती, तेव्हा त्यामध्ये ब्रिटिश पोलिसांनी हजारो लोकांवर गोळीबार केला होता.

‘सरदार उधम सिंह’ ची बायोपिकचे डायरेक्शन शूजित सरकार करत आहे. या चित्रपटाला रॉनी लाहिरी आणि शील कुमार प्रोड्यूस करत आहे. या चित्रपटात सरदार उधम सिंहची भूमिका पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण त्याच्या आजारामुळे या चित्रपटाला त्याने नकार दिला. त्यामुळे ही भूमिका साकारण्याची संधी विकीला मिळाली.

View this post on Instagram

Munda lashkaare maarda! 🌚

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

विकीची निवड करण्याचे कारण चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी सांगितले. ते म्हणाले की, विकीचा अभिनय तुम्ही प्रत्येक चित्रपटात पाहिला आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल की विकीने प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी पुर्णपणे झोकून देईल असा कलाकार मला हवा होता आणि या चित्रपटात एका पंजाबी मुलाची कथा दाखविण्यात येणार आहे आणि विकी हा पंजाबी आहे. त्यामुळे मी या भूमिकेसाठी विकीची निवड केली. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

सिने जगत –

बॉलिवूडच्या ‘या’ खानकडून 35 कोटींची प्रॉपर्टी खरेदी, सुरू करणार ‘सेकंड’ इनिंग

खरंच की काय ! कॅटरीना करणार ‘दबंग’ सलमान खानशी लग्न ?

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

You might also like