धक्कादायक ! आईनं मुलांसमोर केला ‘प्रँक’, पोरांनी घाबरून केला ‘आरडा-ओरडा’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मिडियावर बरेच जण प्रँक व्हिडिओ शेअर करत असतात. परंतू असे काही प्रँक धोकादायक देखील असू शकतात. आई वडील कायमच मुलांना बऱ्याचदा मस्ती करण्यापासून रोखतात. तर काही आई वडील आपल्या मुलांशी खेळतात. कारण आज मैदाने देखील शिल्लक न राहिल्याने आई-वडिलांना मुलांना घरातच खेळावे लागते. परंतू सध्या एका अशाच एका आईचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या आईने असा काही प्रँक केला की मुलं घाबरुन ओरडायलाच लागली.

रेनाइ जॉन्सन यांनी आपल्या मुलांना घाबरवण्यासाठी जिभेमध्ये कैची घुसवली. तेवढ्यात तेथे आलेल्या मुलाने हे पाहून आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पण तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही, कारणं हा व्हिडिओ प्रॅंक होता, या महिलेने जीभेत घुसवलेली कैची आणि जीभ हे दोन्ही खोटे आहेत.

महिलेने मुलांना खेळवता खेळवता आपल्या जीभेत कैची घुसवली आणि ती जमिनीवर पडून राहिली. हे पाहून तेथे आलेला मुलगा घाबरला आणि आरडाओरडा करायला लागला. त्यानंतर तिथे त्या महिलेची मुलगी देखील आली आणि ती देखील हे पाहून ओरडू लागली. मुलं घाबरल्याचे पाहून महिलेने आपली खोटी जीभ काढली. त्यानंतर मुले शांत झाली.

VIDEO –

Visit : Policenama.com