Video : ब्रेकिंग न्यूज सांगताना वृत्तनिवेदक मध्येच थांबला; म्हणाला – ‘पगार मिळत नाही, आम्ही देखील माणसच आहोत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – कोरोनामुळे (corona) जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना तुटपुंज्या पगारावरती नोकरी करावी लागत आहे, अशी भीषण परिस्थिती आहे. याचाच एक प्रत्यय आफ्रिकेतील झांबियामध्ये (Zambian) आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदनकाने पगार मिळत नसल्याचे दुःख थेट लाइव्ह बुलेटीन सुरू असताना व्यक्त केलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात (Social media) तुफान व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कॅलिमिना काबिंदा (Kabinda Kalimina) असे या वृत्तनिवेदकाचे नाव आहे. तो आफ्रिकेतील झांबिया देशातील केबीएन वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत आहे. काबिंदा यांनी लाइव्ह बुलेटिनमध्येच पत्रकारांना वेतन मिळत नसल्याची खदखद व्यक्त केली. ब्रेकिंग बातमी सांगत असतानाच ते थांबले आणि लाइव्ह बुलेटिनमध्येच आपल्या वेदना व्यक्त केल्या. आम्हीही माणसं आहोत, आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला केबीएन टीव्हीकडून पगार दिला जात नाही. माझ्या सहकाऱ्यांना देखील पगार मिळालेला नाही, असे काबिंदा यांनी म्हटले आहे. काबिंदा यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करताना रोखठोक मत व्यक्त केल आहे. होय मी लाइव्ह टीव्हीवर पगार मिळत नसल्याचे सांगितले आहे. कारण अनेक पत्रकार यावर बोलण्यास घाबरतात. याचा अर्थ पत्रकारांनी यावर बोलायचे नाही, अस होत नाहीस अले काबिंदा यांनी म्हटले आहे. 19 जून रोजी हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

Web Titel :- watch zambian journalist kabinda kalimina demands salary in live bulletin

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक