पत्नीला नको त्या आवस्थेत पाहिल्याने छाटले मुंडके

सिल्लोड : पोलीसनामा ऑनलाईन

पतीने झोपेत असताना कुऱ्हाडीने पत्नीचे मुंडके छाटून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी लग्नात हुंडा दिला नाही म्हणून तिच्या पतीने खुन केल्याची तक्रार पोलिसांना दिली. त्यानंतर पतीने व्हायरल केलेले संभाषण पोलिसांच्या समोर आले. त्यात या विवाहितेने आपले इतरांबरोबर असलेल्या संबंधांची कबुली दिल्याचे समोर आले. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी ही घटना घडली होती. पत्नीचा खुन केल्यानंतर पती फरार झाला आहे. पोलिसांनी सासू, सासरा व दीर, जाऊ या चौघांना अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B01G7D9BQ2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’baef019c-a1dd-11e8-bddb-9324d5fbee35′]

मंगलाबाई रवींद्र बनकर (वय ३०, रा. देऊळगाव बाजार, ता. सिल्लोड) असे खुन करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे,  याप्रकरणी विवाहितेचे वडील सूर्यभान किसन सुसुंद्रे (रा. दीडगाव) यांच्या फिर्यादीवरुन पती रवींद्र बनकर, सासरा साहेबराव रामराव बनकर, सासू लंकाबाई साहेबराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर (सर्व रा. देऊळगाव बाजार) यांच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सासरा साहेबराव, दीर अशोक या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, नको त्या स्थितीत पत्नीला पतीने अनेकदा बघितले होते. यानंतर समजूत घातल्यावरसुद्धा सुधारणा झाली नाही. यामुळे रवींद्र बनकर याने मंगळवारी रात्री २ वाजता झोपेतच पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून मुंडके धडावेगळे केले. यानंतर तो फरार झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली.

लग्नात भांडे व हुंडा दिला नाही म्हणून सासरची मंडळी तिला नेहमी त्रास देत होती. तसेच माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करून तिचा छळ करण्यात येत होता. आता तिच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या मंडळीने मुलीचा खून केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या वडिलांनी दिली आहे. सध्या खून नेमका कोणत्या कारणाने केला याचा तपाास पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सासरा व दीर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे संभाषणाची एक क्लिप हाती लागली. रवींद्र याने पत्नीचे दुसऱ्हासोबत संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी खून करण्यापूर्वी एका मित्राच्या साहाय्याने मंगलाबाईशी फोनवर कॉन्फरन्सद्वारे संभाषण करून कुणासोबत अनैतिक संबंध आहे. याची कबुली करून घेतली. त्यानतर संभाषणाची क्लिप काही ग्रुपवर व्हायरल केली. यानंतर आरोपीचे पत्नीचा खून केला.